हेल्पलाइन क्र: 9168079973
Visitors: 111
📢 ठळक सूचना: ग्रामपंचायत हद्दीत एलईडी स्ट्रीटलाईट बसविण्याचे काम सुरू

11-02-2026

सुशासनयुक्त पंचायत (गुड गव्हर्नन्स)
  • 1.1 लोकाभिमुख प्रशासन
    ग्रामपंचायत मार्फत दिल्या जाणाऱ्या सर्व सेवा ऑनलाइन पद्धतीने नागरिकांना सुलभ रित्या देणे (लोकसेवा हक्क अध्यादेश २०१५ अंतर्गत ७ प्रकारचे दाखले तसेच www.dccrs.gov.in द्वारे जन्म व मृत्यू बाबतचे दाखले तसेच अन्य ऑनलाईन सेवा देणे)
  • 1.2 नागरी सेवा सुविधा केंद्र दर्जा
    ग्रामपंचायत कडील आपले सरकार सेवा केंद्र सक्षम करून त्यास नागरी सेवा सुविधा केंद्र दर्जा (सीएससी) मिळवणे. त्याद्वारे सर्व शासकीय कार्यालयातील सर्व प्रकारचे दाखले देणे. तसेच लोकोपयोगी B2C सेवा उपलब्ध करून देणे. (प्रामुख्याने सातबारा उतारा, खाते उतारा, प्रॉपर्टी कार्ड उतारा, फेरफार उतारा इत्यादी)
  • 1.3 तक्रार निवारण
    ग्रामपंचायत कडील प्राप्त झालेले सर्व सार्वजनिक स्वरूपाच्या तक्रारीचे विहित मुदतीत निवारण करणे. ग्रामपंचायत कार्यालयाच्या दर्शनी ठिकाणी तक्रार पेटीद्वारे देखील तक्रार अर्ज संकलन करण्याची सुविधा असणे आवश्यक आहे.
  • 1.4 ग्रामपंचायत वेबसाईट
    ग्रामपंचायत ची वेबसाईट अद्ययावत करुन ग्रामपंचायतीची सर्व माहिती प्रसिध्द करणे (सर्व साधारण माहिती, ग्रामपंचायत वितरीत सर्व सेवा, सर्व निधी जमाखर्च, हाती घेतलेली कामे, पूर्ण झालेली कामे) व माहिती अधिकार कायद्यान्वये प्रसिद्ध करावयाची माहिती वेबसाईटवर प्रसिद्ध करणे.
  • 1.5 CCTV बसवणे
    ग्रामपंचायत एकूण कार्यक्षेत्रात CCTV द्वारे संरक्षणासाठी नियंत्रण ठेवणे व उपाय योजना करणे.
  • 1.6 दफ्तर अद्ययावत व लेखापरिक्षण
    ग्रामपंचायत अंतर्गत नमुना नं.१ ते ३३ व इतर आवश्यक नोंदवह्या अद्ययावत ठेवणे व पंचायतीचे लेखा परीक्षण पूर्ण करून अहवालाची अंतिम स्वीकृती १००% असणे.
  • 1.7 ग्रामपंचायत सर्व सभा व कार्यवृत्तांत
    ग्रापं अधिनियमानुसार मासिक सभा, महिला सभा, वॉर्डसभा व ग्रामसभा नियमितपणे घेणे व त्यांचे कार्यवृत्त अद्ययावत ठेवणे. सभांची नोंद पोर्टलवर घेणे तसेच महिला सभा व ग्रामसभा व्हिडिओ शूटिंग करणे.
  • 1.8 ग्रामविकास समिती कामकाज
    शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ग्राम विकास समित्या कार्यरत ठेवणे (ग्राम आरोग्य पोषण, पाणी पुरवठा व स्वच्छता समिती, कृषि विकास समिती, शाळा व्यवस्थापन समिती, बाल हक्क संरक्षण समिती, जैव विविधता समिती इ.)
  • 1.9 मतदार/नागरिकांनी अॅप डाऊनलोड करणे
    मेरी पंचायत, पंचायत निर्णय व ग्रामसंवाद या अॅपबाबत प्रचार व प्रसिध्दी करून मतदार/नागरिकांकडून किमान एक अॅप डाऊनलोड करून घेणे.
  • 1.10 आयुष्यमान भारत कार्ड
    केंद्र व राज्य शासनाच्या आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत सर्व पात्र लाभार्थ्यांना कार्ड मिळवून देणे व आवश्यकतेनुसार लाभ मिळवून देणे.
  • 1.11 अनिवार्य बाबींवरील तरतूद व खर्च
    ग्रामपंचायतीने दिव्यांग कल्याण (५%), महिला व बालकल्याण (१०%) तसेच मागासवर्गीय कल्याण (१५%) यावर तरतूद करून १००% खर्च करणे.
  • 1.12 दिव्यांग ओळखपत्र
    सर्व पात्र दिव्यांग लाभार्थ्यांना ओळखपत्र मिळवून देणे.

01-04-2026

स्वच्छता अभियान
  • 2.1 कर व पाणीपट्टी वसुली
    मोहीम कालावधीपर्यंत ग्रामपंचायतकडील घरपट्टी व पाणीपट्टी व इतर करांची चालू थकबाकी वसुली करणे, त्यासाठी QR code तयार करणे.
  • एकूण कर मागणी व मोहीम कालावधीपर्यंत झालेली वसुली यांच्या आधारे गुण देय राहतील.
  • घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीसाठी QR कोड / ऑनलाइन सिस्टीमचा वापर केल्यास वसुली प्रमाणात गुण देय.
    • घरपट्टी कराच्या थकबाकीची वसुली – 90% / 80% / 70%
    • घरपट्टी चालू वर्षीच्या मागणीप्रमाणे कर वसुली – 100% / 90% / 80%
    • पाणीपट्टी थकबाकीची वसुली – 90% / 80% / 70%
    • पाणीपट्टी चालू मागणी वसुली – 100% / 90% / 80%
  • 2.2 लोकवर्गणी
    लोकवर्गणी मधून निधी उपलब्ध करून घेणे व त्या निधीतून लोकोपयोगी सोयी सुविधा निर्माण करणे.
    • मोहीम कालावधीपर्यंत प्रति 1000 लोकसंख्येस ₹2,00,000 या प्रमाणात उद्दिष्ट निश्चित करणे.
    • उद्दिष्ट साध्याच्या प्रमाणात गुण देणे.
    • उद्दिष्टापेक्षा अधिक लोकवर्गणी असल्यास नाविन्यपूर्ण बाबीमध्ये विचार केला जाईल.
    • दि.०१ एप्रिल पासून मोहीम कालावधीपर्यंत जमा झालेला लोकवर्गणी निधी → लोकसंख्येनुसार निधी जमा झाल्यास 100% गुण
    • लोकवर्गणीमधून नाविन्यपूर्ण लोकोपयोगी सुविधा निर्माण झाल्यास पूर्ण गुण देय
  • 2.3 स्वउत्पन्न (OSR)
    मोहीम कालावधीत ग्रामपंचायतीकडे गाळा, दुकानभाडे, जाहिराती, मोबाईल टॉवर भाडे, अवजारे बँक इ. माध्यमातून स्वउत्पन्न असणे व त्याची वसुली करणे.
  • एकूण मागणी व मोहीम कालावधीपर्यंत झालेली वसुली तपासून गुण देणे
  • ग्रामपंचायत दस्तऐवज तपासून लोकसंख्या गटानुसार उद्दिष्ट पूर्ण असल्यासच पूर्ण गुण देणे
  • वसुली प्रमाण – 100% / 90% / 80%

14-11-2025

जल समृध्द, स्वच्छ व हरित गाव (Climate Action)

3.1 पाण्याचा ताळेबंद
लोकसहभागातून पाण्याचा ताळेबंद (वॉटर बजेट) तयार करून पाणी व्यवस्थापन आराखडा तयार करणे. जनजागृती, शिवार फेरी इत्यादी उपक्रमातून ताळेबंद तयार करून दर्शनी भागात लावणे.

3.2 शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा
गावातील सर्व कुटुंबांना नळाद्वारे शाश्वत शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणे (FHTC – Functional Household Tap Connection).
एकूण कुटुंबांपैकी ज्या कुटुंबांना वैयक्तिक नळ कनेक्शन दिले त्यानुसार गुण देणे.

3.3 विद्युत देयके
ग्रामपंचायत नळ पाणी पुरवठा योजना व रस्त्यावरील दिवाबत्ती वीज देयकांचा नियमित भरणा करणे व थकबाकी शून्य ठेवणे.

  • नळ पाणी पुरवठा वीज देयक → थकबाकी शून्य असल्यास पूर्ण गुण
  • रस्त्यावरील दिवाबत्ती वीज देयक → नियमित भरणा व थकबाकी शून्य असल्यास पूर्ण गुण

3.4 पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत बळकटीकरण
तलाव, नदी, नाले पुनर्जीवित करणे, संवर्धन करणे, वनराई बंधारे, सिमेंट बंधारे, केटी वेअर गेट बसवणे व पाण्याचा कार्यक्षम वापर करणे.
गावातील सर्व स्त्रोतांचे 100% बळकटीकरण केल्यास पूर्ण गुण.

3.5 रेन वॉटर हार्वेस्टिंग युनिट
गावातील सर्व शासकीय व निमशासकीय इमारतींमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग युनिट स्थापित करणे.
प्रगतीनुसार गुण देणे.

3.6 सूक्ष्म सिंचनाखालील क्षेत्र वाढविणे
ग्रामपंचायत क्षेत्रातील शासकीय/निमशासकीय क्षेत्रात झाडे, बाग, फळबाग यासाठी सूक्ष्म सिंचनाचा वापर वाढविणे.
मोहिमेपूर्वी व नंतरच्या क्षेत्रफळानुसार गुण देणे.

3.7 अपारंपरिक ऊर्जा व सौर ऊर्जा वापर

  • नळ पाणी पुरवठा योजना सौर ऊर्जेवर रूपांतर करणे
  • ग्रामपंचायत इमारतीमध्ये सोलर युनिट बसवणे
  • प्रधानमंत्री सूर्यधर योजना अंतर्गत सौर प्रकल्प बसवणे
  • गावातील किमान 20% घरांमध्ये सौर ऊर्जा वापर
  • प्राथमिक शाळा व अंगणवाडी सोलर प्रकल्प
  • शेतकऱ्यांसाठी सौर कृषी पंप प्रकल्प (किमान 25%)

3.8 वृक्ष लागवड व संवर्धन
अभियान कालावधीत जिओटॅगिंगसह नवीन वृक्ष लागवड करणे.
“१ व्यक्ती १ झाड” या संकल्पनेनुसार वृक्षसंवर्धन करणे.

3.9 संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान
दिनांक निहाय उपक्रम राबवून सक्रिय सहभाग घेणे.
शासन निर्णयानुसार अहवाल तपासून गुण देणे.

3.10 प्लास्टिक बंदी
गावात एकल प्लास्टिक वापर पूर्णतः बंद करणे.
दंडात्मक कारवाई करणे व त्याची अंमलबजावणी 100% असणे.

3.11 घनकचरा व्यवस्थापन
सुका व ओला कचरा वेगळा करून संकलन करणे.
ओल्या कचऱ्यापासून खत तयार करणे व सुक्या कचऱ्याचे शास्त्रशुद्ध व्यवस्थापन करणे.

3.12 सांडपाणी व्यवस्थापन
शोषखड्डा, एफएसटीपी, डी-वॅट इत्यादी तंत्रज्ञान वापरून सांडपाणी व्यवस्थापन करणे.
100% अंमलबजावणी असल्यास पूर्ण गुण.

26-01-2026

मनरेगा व इतर योजनांशी अभिसरण

4.1 महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा)
गावामध्ये रोजगार निर्माण करणे व स्थावर मालमत्ता निर्माण करणे.
(उदा. ५० मजूरांना १० दिवस काम दिल्यास मनुष्यदिन निर्मिती व निधी निर्माण)

  • एकूण किमान २० सार्वजनिक कामांचे उद्दिष्ट
  • पूर्ण केलेल्या कामांची संख्या, प्राप्त निधी (किमान ₹१० लाख) व मनुष्यदिन निर्मिती विचारात घेणे
  • अभियान कालावधीपर्यंत मनरेगा अंतर्गत विकास कामांमध्ये निधी अभिसरण तपासून गुण देणे
  • उद्दिष्टानुसार मनुष्यदिन निर्मितीच्या प्रमाणात गुण देणे

4.2 निर्मल शोषखड्डा व जलसंधारण कामे
(वैयक्तिक/सामुदायिक शोषखड्डा, जलतारा कामे, विहीर पुनर्भरण, रेन वॉटर हार्वेस्टिंग, छतावरील पाणी संकलन)

  • एकूण किमान कामांचे उद्दिष्ट
  • पूर्ण झालेल्या कामांची संख्या
  • जलतारा/शोषखड्डा धारक शेतकरी संख्येनुसार गुण देणे

4.3 जलसंधारण कामे
(नवीन विहीर, विहीर दुरुस्ती, विहीर पुनर्भरण, शेततळे, ढाळीचे बांध, अनगड दगडी बांध)

  • एकूण किमान कामांचे उद्दिष्ट
  • पूर्ण झालेल्या कामांची संख्या
  • किमान ५ जलसंधारण कामे पूर्ण होणे आवश्यक

4.4 शेतीपूरक उपक्रम
(जनावरांचा गोठा, कुक्कुट पालन शेड, बायोगॅस, शेळीपालन शेड, नॅडप/व्हर्मी कंपोस्टिंग, कांदा चाळ)

  • एकूण किमान ५ कामांचे उद्दिष्ट
  • पूर्ण झालेल्या कामांची संख्या
  • शेतीशी निगडित कामांच्या संख्येनुसार गुण देणे

4.5 घरकुल व मनरेगा अभिसरण

  • एकूण मंजूर घरकुलांची संख्या
  • मनरेगा अभिसरणातून पूर्ण झालेली घरकुलांची संख्या
  • 100% घरकुल कामे अभिसरणातून पूर्ण झाल्यास पूर्ण गुण

13-03-2026

गावपातळी वरील संस्था सक्षमीकरण

5.1 ग्राम पंचायत सक्षमीकरण
ग्रामपंचायत ठिकाणी आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करणे:

  • मिटिंग हॉल व प्रतीक्षालय
  • सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत अधिकारी यांच्यासाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था
  • पिण्याच्या पाण्याची सुविधा व दिव्यांगांसाठी रॅम्प
  • दर्शनी भागावर सर्व योजनांचे फलक
  • वाचनालय व संगणकीकृत ग्रंथालय
  • महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह
  • रंगरंगोटी व सुशोभीकरण

5.2 शाळा सुविधा सक्षमीकरण
गावातील सर्व शाळांमध्ये खालील सुविधा उपलब्ध करणे:

  • सर्व शाळा डिजिटल करणे
  • पिण्याच्या पाण्याची सुविधा
  • मुला-मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह
  • हॅण्ड वॉश स्टेशन
  • रंगरंगोटी व बोलक्या भिंती
  • पोषक परसबाग
  • माध्यान्ह भोजनासाठी किचन व्यवस्था
  • सर्व वर्गांमध्ये CCTV
  • संरक्षण भिंत

5.3 अंगणवाडी सुविधा सक्षमीकरण
गावातील सर्व अंगणवाड्यांमध्ये:

  • डिजिटल सुविधा उपलब्ध करणे
  • बालस्नेही स्वच्छतागृह व पिण्याच्या पाण्याची सुविधा
  • पोषक परसबाग
  • बोलक्या भिंती रंगविणे

5.4 पशुवैद्यकीय उपचार केंद्र
पशुवैद्यकीय केंद्रात:

  • स्वच्छतागृह व पिण्याच्या पाण्याची सुविधा
  • जनावरांसाठी खोडा
  • घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन
  • उपचार केंद्र नसल्यास पर्यायी सुविधा उपलब्ध करणे
  • पशुधन अधिकारी प्रमाणपत्रानुसार गुण देणे

5.5 स्मशानभूमी सुविधा
स्मशानभूमीत खालील सुविधा असणे:

  • शेड / दफनभूमी
  • बैठक व्यवस्था व पाण्याची सोय
  • पोहोच रस्ता
  • सौर दिवे व वृक्षारोपण

5.6 व्यायामशाळा सुविधा
गावात खुली व्यायामशाळा किंवा सुविधायुक्त व्यायामशाळा उपलब्ध करणे.

5.7 धार्मिक स्थळांचे सुशोभीकरण
ग्रामपंचायत क्षेत्रातील तीर्थक्षेत्र / धार्मिक स्थळ / पर्यटन स्थळ यांचे सुशोभीकरण करणे.

23-03-2026

उपजिविका विकास, सामाजिक न्याय

6.1 प्रधानमंत्री आवास योजना व राज्यस्तरीय घरकुल योजना
मागील अपूर्ण व नवीन मंजूर सर्व घरकुल कामे पूर्ण करणे.

  • PMAY टप्पा-१ व राज्यपुरस्कृत योजनेतील अपूर्ण घरकुले पूर्ण करणे
  • PMAY टप्पा-२ व 2024-25 पासून मंजूर घरकुले पूर्ण करणे
  • भूमिहीन लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करून देणे
  • पूर्णत्वाच्या प्रमाणात गुण देणे

6.2 महिला बचत गट सहभाग (MSRLM)
महिला मतदारांच्या प्रमाणात बचत गटामध्ये सहभाग वाढवणे व बँकेमार्फत कर्ज वितरण करणे.

  • 100% महिला सहभाग बचत गटात असणे
  • पात्र बचत गटांना कर्ज वितरण
  • सहभाग व लाभाच्या प्रमाणात गुण देणे

6.3 लखपती दिदी अभियान
बचत गटातील महिलांना लखपती दिदी बनवणे.

  • एकूण महिलांपैकी लखपती दिदी झालेल्या महिलांचे प्रमाण
  • त्या प्रमाणात गुण देणे

6.4 महिला शेतकरी उत्पादक संस्था
महिलांचा स्वयंसहायता समूह व शेतकरी उत्पादक संस्थेमध्ये सहभाग वाढवणे.

  • किमान 1 महिला शेतकरी उत्पादक संस्था स्थापन करणे
  • शासनमान्य प्रमाणपत्रानुसार गुण देणे

6.5 कौशल्य प्रशिक्षण व स्वयंरोजगार
गावातील पात्र सुशिक्षित उमेदवारांना कौशल्य प्रशिक्षण देणे व बँकेमार्फत कर्ज उपलब्ध करणे.

  • पात्र लाभार्थ्यांना प्रशिक्षण देणे
  • प्रशिक्षित उमेदवारांना कर्ज वितरण
  • उद्दिष्टानुसार गुण देणे

6.6 सामाजिक अर्थसहाय योजना (केंद्र/राज्य)
गावातील सर्व पात्र वंचित लाभार्थ्यांना योजनांचा लाभ मिळवून देणे.

  • संजय गांधी निराधार योजना
  • श्रावण बाळ योजना
  • इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना
  • राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना
  • अॅग्रीस्टॅक पोर्टलवर शेतकऱ्यांची नोंदणी
  • लाभार्थ्यांना ओळखपत्र देणे
  • 8वी ते 10वी विद्यार्थ्यांना जातीचे दाखले मिळवून देणे

6.7 शेतकरी उत्पादक संस्था व गट शेती
शेतकऱ्यांनी गट शेतीमध्ये सहभागी होऊन व्यवसाय करणे.

  • शेतकरी उत्पादक संस्था स्थापन करणे
  • गटाद्वारे व्यवसाय सुरू करणे

6.8 अॅनिमिया मुक्त गाव
गावात अॅनिमिया मुक्त अभियान राबवणे.

  • सुरुवातीस महिलांची तपासणी करणे
  • अॅनिमिया मुक्त झालेल्या महिलांचे प्रमाण
  • अंमलबजावणीच्या प्रमाणात गुण देणे

13-01-2026

लोकसहभाग व पायाभूत सुविधा विकास

7.1 लोकसहभाग व श्रमदान
लोकसहभागातून चळवळ उभी करून आठवड्यातून किमान एक दिवस श्रमदान करणे व गावात स्वच्छता राखणे.

  • दर आठवड्यातून एकदा श्रमदान केल्यासच गुण देणे
  • अभियान कालावधीत श्रमदानातून मनुष्यदिन निर्माण झाल्याचे ग्रामपंचायत दस्तऐवज तपासणे
  • 100% अंमलबजावणी असल्यास गुण देणे
  • श्रमदान कार्यक्रमात लोकसंख्येनुसार सहभाग:
    • किमान 100 ग्रामस्थ
    • किमान 200 ग्रामस्थ
    • किमान 300 ग्रामस्थ

7.2 रस्ते व पाणंद रस्ते विकास
गावातील रस्त्यांची कामे, दुरुस्ती व पाणंद रस्त्यांना प्राधान्य देणे.

  • कच्च्या रस्त्यांची एकूण लांबी व दुरुस्त/नवीन तयार केलेल्या रस्त्यांची लांबी विचारात घेणे
  • ग्रामपंचायत व महसूल दस्तऐवजानुसार प्रत्येक 1000 लोकसंख्येस किमान 500 मीटर रस्ता काम आवश्यक
  • पाणंद रस्ते:
    • करावयाच्या कामांची संख्या व लांबी
    • दुरुस्त किंवा नव्याने तयार केलेले रस्ते
    • 1000 लोकसंख्येस किमान 500 मीटर निकषानुसार गुण देणे

06-05-2026

ग्रामपंचायत मेहदर

विवरण पत्र क्र. १३ (न नं ३ व ४ ग्रामनिधी) सन २०२५-२६

06-05-2026

५% (पेसा) ग्राम कोष निधी मेहदर

जमा खर्च २०२५-२६

06-05-2026

१५ वा वित्त आयोग

जमा खर्च सन २०२५-२६