मौजे:मेहदर या गावात जाऊन जेष्ठ नागरिकांसोबत चर्चा करून गावाच्या इतिहासासंदर्भात माहीती घेतली. मेहदर हे नाशिक जिल्ह्यापासून ८३ कि.मी.अंतरावर व कळवण तालुक्यापासून २६ कि.मी अंतरावर वसलेले आहे. ग्रामीण भागातील जनतेचा शेती या व्यवसायाबरोबरच सर्वांगीण विकास व्हावाग्रामीण भागाचे व गोर गरिबांचे . कसामाजि ,त्याचा आर्थिक ,जीवनमान उंचवावे यासाठी लोक .व सांस्क्रृतिक विकास व्हावा रजिष्टर योजनेंतर्गत करतांना गावाच्या ऐतिहासिक जैविक विविधता नोंदवही पार्श्वभूमी बद्दल माहितीचा मागोवा घेतला असता काही जेष्ठ नागरिकांनी खालील प्रमाणे माहीती दिली धरणातून उचलले जाते .
गावात पुरातन कालीन एक किल्ला आहे त्याचे नाव धोडप किल्ला. असून किल्ल्यावर पुरातन टाके आहेत. गावातील जेष्ठ मंडळी सांगतात कि, गावातील धोडप किल्ला हा महाराष्ट्रातील किल्ल्यांच्या तुलनेणे तीन नंबरचा उंच किल्ला आहे. तसेच गावात अनेक प्रेक्षणीय स्थळे आहेत. गावातील लोक प्रामुख्याने शेती हा व्यवसाय करतात. गावात ग्रामपंचायतीची स्थापना ०१/०४/१९९४ झाली.
सरपंच
श्रीमती. शहाणु देवराम राऊत या ग्रामपंचायत मेहदर (ता. कळवण, जि. नाशिक) यांच्या विद्यमान सरपंच आहेत. त्या गावातील महिलांचे सशक्तीकरण, शेतकऱ्यांचा विकास, पाणी व आरोग्यसुविधा सुधारणा या क्षेत्रात विशेष लक्ष देतात. गावातील लोकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी समजून घेणे आणि त्यावर उपाययोजना करणे ही त्यांची कार्यपद्धती आहे. महिलांच्या स्वयंसहाय्यता गटांना प्रोत्साहन देऊन त्या ग्रामीण भागातील आर्थिक स्वावलंबन वाढविण्यासाठी कार्यरत आहेत.
गावाच्या ऐतिहासिक व सांस्कृतिक वारशाचे जतन करणे, शिक्षणाला चालना देणे आणि तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे ही त्यांची मुख्य उद्दिष्टे आहेत. ग्रामपंचायतच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या विकास योजनांमध्ये पारदर्शकता राखून सर्वसामान्य जनतेचा विश्वास संपादन करण्यात त्यांना यश आले आहे. त्यांच्या नेतृत्वामुळे ग्रामपंचायत मेहदर सर्वांगीण विकासाच्या दिशेने पुढे जात आहे.
08/08/2025, 10:40 am
ग्रामस्थांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी मोफत तपासणी, औषधोपचार आणि जनजागृतीसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन केले जाते.
06/09/2025, 04:00 pm
गावातील शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञान, द्राक्ष व कांदा लागवड, तसेच शेतमाल विक्रीबाबत मार्गदर्शन देण्यासाठी कृषी मेळावा आयोजित केला जातो.
02/09/2025, 06:10 am
पर्यावरण संवर्धनासाठी ग्रामस्थांच्या सहभागातून वृक्षारोपण व स्वच्छता मोहिम राबविली जाते.
हर घर जल हर घर नल योजनेमार्फत सर्व कुटुंबाना स्वतंत्र नळ कनेक्शन
प्राथमिक व माध्यामिक १ ते १० शाळा
महिला व बाल कल्याण
गावात सामाजिक सभा मंडप मल्हार बाबा मंदिरयेथे असून सार्वजनिक कार्यक्रम विवाह सोहळा वर्षश्राद्ध , धार्मिक विधी होतात
गावात युवकांसाठी स्वतंत्र व्यायाम शाळा इमारत
जनसुविधा अंतर्गत दुमजली सुसज्य ग्रामपंचायत कार्यालयाचे काम प्रगती पथावर
नागरिकांसाठी दाखले वितरण व online सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणारे सेंटरख्या
ग्रामपंचायतीकडून मयत व्यक्तींचा गोशाळे मार्फत पर्यावरण पूरक अंत्यसंस्कार मोफत केला जातो.
धोडप किल्ला हा नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यात, मेहदर गावाजवळ वसलेला आहे. हा किल्ला उंचीच्या दृष्टीने महाराष्ट्रातील तिसऱ्या क्रमांकाचा किल्ला मानला जातो. समुद्रसपाटीपासून सुमारे ४,६७२ फूट (१,४२४ मीटर) उंचीवर असलेला हा किल्ला गिर्यारोहक आणि पर्यटकांसाठी आकर्षणाचे ठिकाण आहे.
विस्तार अधिकारी ग्रामपंचायत विभाग
मा.सहाय्यक गट विकास अधिकारी
मा.गट विकास अधिकारी (उ. श्रे.)